दिनांक निवडा
शैक्षणिक वर्ष: १५ जून २०२६ ते ३० एप्रिल २०२७दैनिक पाठटाचण
दिनांकदिनविशेष
वारसुविचार
साप्ताहिक विषयवार तासिका भारांश
आठवड्यात सोमवार ते गुरुवार प्रत्येकी ८, शुक्रवारी ९ आणि शनिवारी ७ अशा एकूण ४८ तासिका. संपादन करताना दोन तासिकांची अदलाबदल करा. सर्व विषयांच्या तासिका सलग ठेवणे बंधनकारक नाही. एखाद्या दिवशी एखाद्या विषयाच्या दोन तासिका आल्यासच त्या सलग असतील. कला शिक्षण, व्यवसाय शिक्षण व शारीरिक शिक्षण व निरामयता या तासिका सोमवार ते शुक्रवार मध्यान्होत्तर सत्रात; शनिवारी पहिली तासिका शारीरिक शिक्षण व निरामयता विषयासाठी राखीव आहे; इतर तासिका व विषयभार पूर्ववत आहेत.
२. मूल्यमापन व इतर नोंदी
आकारिक मूल्यमापनासाठी सलग २ शैक्षणिक दिवस आणि संकलित मूल्यमापनासाठी सलग ४ शैक्षणिक दिवस राखीव असतील. इयत्ता सहावीच्या द्वितीय सत्रअखेर तोंडी / प्रात्यक्षिक मूल्यमापन १२–१३ एप्रिल आणि संकलित मूल्यमापन २२ एप्रिलपासून नियोजित आहे. निवडलेल्या दिवशी नियमित अध्ययन-अध्यापन नोंदी येणार नाहीत. परीक्षा नोंदी पूर्ण दिवसासाठी तयार होतील आणि नियमित पाठ पुढील उपलब्ध शैक्षणिक दिवसांवर क्रमाने पुढे सरकतील.
इतर एकदिवसीय नोंदी
कौशल्याधारित विषय – वार्षिक व मासिक नियोजन
इयत्ता सहावी व सातवीसाठी या आवृत्तीत कायम ठेवलेल्या कला, व्यवसाय/कार्यशिक्षण व शारीरिक शिक्षण या विषयांचे घटक, अध्ययन निष्पत्ती आणि विषयविशिष्ट अध्ययन अनुभव येथे दर्शविले आहेत.